आपण यशा पासून का दूर राहता याचा विचार केला का?

 आपण यशा पासून का दूर राहता याचा विचार केला का?याच्या काही तत्वावर आपण लक्ष केंद्रित केले आहे,

अपयशची भीती -:

आपल्या एकच भीती असते ती म्हणजे आपयशाची आणि ती माणसाच्या मनात घर करून बसते आणि आपण आत्मविश्वास आभावामुळे जीवनात कोणते उत्तम काम करू शकत नाही, जर त्या भीती वर मात केली तर कोणतेही अवघड काम सहजतेने पूर्ण करू शकतो.

2. स्वयं :पेरणा नसणे -:

माणसा मध्ये सर्वात जास्त अभाव असतो तो स्वयं पेरणेचा, स्वयं :पेरणा नसणे म्हणजे माणसाची असे असते की, प्रवासाला जाण्यासाठी गाडी तर घेतली आहे, पण गाडीत पेट्रोल नाही अशी अवस्था असेल तर चालेल का? नाही ना, मग तुम्ही या आशेवर राहता की,कोणी तरी सांगेल आपल्याला काय करायचं आहे, आणि आपण नंतर ते काम चालू करणार,असे जर चालले तर कसे चालणार स्वयं पेरणा हे इंधन आहे त्याच्या जोरावर माणूस यशाला गवसनी घालू शकतो म्हणून माणूस स्वयं पेरीत असला पाहिजे,

3. स्वता वरील विश्वास -:

मित्रानो स्वतःवरील विश्वास तर खरा बाहूबली आहे, त्याच्या जोरावर आपण कोणते हि कठीण प्रसंगावर मात करू शकतो जर आपण स्वतःसाठी एक मार्ग निवडला आहे, पण तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल तर, तुम्ही स्वता त्या ध्येंय पर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून तर स्वतःवरील निष्ठा व आत्मविश्वास हा तर यश प्राप्ती चे मूलभूत घटक आहेत.

4. तुम्ही स्वतःला ओळखता का?-:

प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगली क्षमता व गुणवत्ता असते,परंतु कशाप्रकारे आहे हे माहीत नसते, त्त्यांच्या मध्ये कोणते गुण आहेत, आणि तो त्याचा वापर करून दैनंदिन जीवनामधील सर्व प्रश्न सोडू शकतात. याची त्याना जाणीव पण नसते, म्हणजे ते स्वतःला ओळखु शकत नाही, कोणी तरी त्यांना त्याची जाणीव करून दयावी लागते, प्रत्येक माणसा मध्ये असामान्य गुणांची शक्ती असते परंतु त्याची त्याला जाणीव झाली पाहिजे, ज्याला झाली त्या माणसा पासून आयुष्यात कधी ही सक्सेस कधी दूर जाऊ शकत नाही.

5. जबाबदारीचा अभाव -:

माणसाने कोणतेही काम हातात घेतले की, ते किती जिम्मेदारी ने करतात याच्यावर माणसाच्या यशाची ग्रोथ अवलंबून असते, जबाबदारीच्या भावातून यशाची दिशा प्रखलतेणे जाणवते व त्यासाठी जिम्मेदार बना कारण एक जिम्मेदार व्यक्तीमत्व तेजसवी यशाचे कारण ठरते.

6. ध्येयस झोकून देणे :-

एखादे मोठे यश प्राप्ती करिता स्वतःला झोकून दिले पाहिजे, कारण ध्येय वेडे लोकांनाच मोठे यश प्राप्त होते, कारण त्या लोकांना फक्त त्याचे ध्येय दिसते, ज्या प्रमाणे महाभारतातील अर्जुनला फक्त माशाचा डोळा दिसत होता बाकी नाही, असे लोकच अचूक लक्ष भेदतांत आणि नविन्याचं अविष्कार करतात आणि जगा समोर स्वतःच आदर्श निर्माण करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?