आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?
या लेखाचे शीर्षक जरी कटू असेल परंतु सत्य आहे, हे ही खरे आहे की, कल्पनेत यश समावले आहे, परंतु कल्पना मूर्त स्वरूपात अवतारतात तेव्हा त्यांना खरा अर्थ प्राप्त होतो अन्यथा आपण केवळ भास चिंता निर्माण करीत राहू, खरं तर आपल्या कल्पनात आंतरिक शुद्धता व स्पष्टता आली पाहिजे तिचे कृतीत रूपांतर झाले पाहिजे. कारण माणसाच्या मनात स्पष्टता विशुद्धाता असते जेव्हा त्याच्या हातून घडते तेव्हा ती राहत असते,
परंतु स्थिती आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे, आपण अनेकदा आपण कल्पना खूप चांगल्या पद्धतीने करतो पण त्या प्रत्यक्षात कृतीत आल्याच नाही तर?
1. कल्पना -:
कल्पना ही कोणत्याही कार्याची प्रथम कृती आहे, कोणत्याही कृतीची सुरुवात कल्पनेतून होते, कल्पना करून माणूस त्या गोष्टी पर्यंत जाण्याची दिशा शोधता येते, कल्पना ही माणसातील सर्वात मोठी शक्ती आहे, तिच्या सहयाने माणूस असाध्य गोष्ट साध्य करू शकतो, मोठ -मोठया संशोधक यांनी पण कल्पना या शक्ती वापर करून आपले संशोधन सिद्ध केले आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तिथे आपली कल्पना जाते, कल्पना ही माणसातील असम्य शक्ती आहे ती माणसाने जागृत ठेवली पाहिजे, परंतु नुसती कल्पना असेल आणि कृती नसेल तर तिचे महत्व शून्य आहे,
2. कृतीशिलता -:
कल्पना केल्या शिवाय कोणत्याही कोणत्याही यशापर्यंत जाणे अशक्य आहे, हे ही खरे आहे की, कल्पना कृतीत नाही उतरली तर तीची शक्ती शून्य होत जाते, आपण कृतीशील विचारवंत होणे महत्वाचे आहे,
3. भन्नाट कल्पना -:
आपल्याला एखादी भन्नाट कल्पना सुचने ही पण आपल्यातील एक असाधारण शक्ती आहे, कारण तशा कल्पना पण सुचने महत्वाचे आहे, आणि तिला कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे ज्या माणसाला भन्नाट कल्पना सुचतात त्या माणसाने कृती शीलता पण त्याच पद्धतीने अंगीकारली पाहिजे कारण नुसते कल्पना करून काही साध्य होत नाही,
4. प्रारंभ करणे :-
मित्रानो कल्पना येणे महत्वाचे आहे, परंतु आपण नुसते कल्पना करत बसलो आणि अपयशच्या भीतीने आपण त्याला कृतीत आणलेच नाही, नाही तर त्या कल्पना कृती शिवाय निर्थक ठरतात त्यासाठी आपण आपल्या कल्पना छोटया कृतीतुन होईना आज कृतीत आणण्यास प्रारंभ करा नुसते कल्पना करीत बसने निर्थक आहे,परंतु केलेली कल्पना कृतीत आणणे सार्थक काम आहे, म्हणून तर आपण केलेल्या चांगल्या कल्पना असतील त्यांच्यावर आज काम करायला सुरुवात करा वेळ वाया जाऊ देऊ नका,

Like follow page
उत्तर द्याहटवा